25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरविठो रखुमाय : रंजकतेने उलगडलेले नाट्यरुप

विठो रखुमाय : रंजकतेने उलगडलेले नाट्यरुप

लातूर : एजाज शेख

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयद्वारा आयोजित ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२४ ची प्राथमिक फेरीत लातूर केंद्रावर येथील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृति सभागृहात दि. १३ डिसेेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अस्मिता पर्व फाऊंडेशन , लातूर निर्मित व रत्नाकर मतकरी लिखीत आणि प्रा. विजय मस्के दिग्दर्शित ‘विठो रखुमाय’ हे दोन अंकी नाटक सादर करण्यात आले. मोठ्या रंजकतेने उलगडत गेलेल्या या नाटकाला नाट्यरसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

पंढरीचा विठोबा आणि रखुमाई यांना समस्त भक्तांनी देवपण बहाल केले. ते देव असले तरी मानवी नातेसंबंधातील ताणेबाणे, रुसवेफु गवे, अडीअडचणी त्यांनाही चुकल्या नाहीत. देव हा देव असला तरी त्याच्यातही आपल्यासारखाच माणुस आहे. त्यालाही लढणे-झगडणे हे क्रमप्राप्त आहेच, अशा अर्थाने सुंबरान मोठ्या रंजकतेने या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडत जाते. रत्नाकर मतकरी यांच्या या दमदार नाटकाचे सादरीकरणही तितकेच दमदार झाले.

तिसरी घंटा वाजते. पडदा उघतो आणि… सुंबराने मांडीलं… या बहारदार गीताने नाटकाला सुरुवात होते. विठ्ठल ही मध्यवर्ती भुमिका विजय मस्के या कलावंताने खुप मेहनतीने वठवली. हर्षाली इंगळे यांनी पदुबाईचे पात्र साकारताना त्या पात्रास पुर्ण न्याय देण्याचा असोशिने प्रयत्न केला. प्रतिक्षा पाटवकर यांची तुळशी चांगलीच लक्षात राहिली. प्रमोद कांबळे यांनी माळीरायाच्या भुमिकेत चांगला अभिनय केला. रुपेश सूर्यवंशी (बप्पा), आरती सांगवे(सई), अंकिता आदमाने (दर्यादेवी), संदीप घुगरे(प्रधान), वैभव कवडे(मुनीम), रोहन गायकवाड(हुज-या), किरण कांबळे (मांत्रीक), सुदर्शन भांदर्गे, आकाश कचरे, अभिषेक गायकवाड, शिवम सुतार, अस्मिता ढवळे, वैदेही राजहंस, नम्रता कवडे, समृद्धी वरजे(धनगर पुरुष, महिला वृंद), प्रा. शरद पाडे (म्होरक्या) यांनी आपापल्या भुमिका चांगल्या प्रकारे वठवल्या.

प्रा. विजय मस्के यांचे दिग्दर्शन कौशल्यपूर्ण होते. सुरज साबळे, हरी कुंभार, अनंत खलुले यांनी पार्श्व संगीताची जबाबदारी चोख पार पाडली. प्रा. शरद पाडे, अनमोल कांबळे, ज्ञानेश्वरी जाधवर, प्रियंका कांबळे, वैष्णवी कासले यांनी पार्श्व गायनात आपली छाप टाकली. मास्टर सुनील वेरेकर यांचे नृत्य दिग्दर्शन अफलातून होते. अस्मिता आणि नम्रता यांची वेशभूषा, प्रतिक्षा पाटवकर यांची रंगभूषा उत्तम होती. शरद खंदाडे यांनी प्रकाशयोजनेत कल्पकता दाखवली. प्रमोद कांबळे, अमोल होके यांचे नेपथ्य नाटकाची उंची वाढवणारे होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR