24.5 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमुख्य बातम्याविदर्भाचे प्रश्न अनुत्तरित राहणार; आठवड्यात गुंडाळणार अधिवेशन

विदर्भाचे प्रश्न अनुत्तरित राहणार; आठवड्यात गुंडाळणार अधिवेशन

नागपूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात भाजप हा मोठा पक्ष ठरला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. सध्या मुंबईत राज्याचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आमदारांचा शपथविधी, विधानसभा अध्यक्षांची निवड, शोक प्रस्ताव आणि राज्यपालांचे अभिभाषण असे कामकाज पार पडले.

येत्या १६ डिसेंबरपासून नागपुरातील हिवाळी अधिवेशन सुरु होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या काळात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानुसार १२ डिसेंबरपासून सचिवालय नागपूरमध्ये दाखल होणार आहेत. १५ डिसेंबरला संपूर्ण सरकार नागपुरात दाखल होईल.

हिवाळी अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न सुटावे, त्यावर विधिमंडळात चर्चा व्हावी म्हणून दरवर्षी विधिमंडळाचे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतले जाते. पण आता एका आठवड्याच्या अधिवेशनात विदर्भातील प्रश्न मार्गी लागणार का? असा सवाल विदर्भातील जनतेचा आहे. उल्लेखनिय म्हणजे विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्नालाही फाटा दिल्याची माहिती समोर येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR