22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्रविदर्भात पाऊस?; हवामान खात्याचा अंदाज

विदर्भात पाऊस?; हवामान खात्याचा अंदाज

पुणे : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांत राज्याच्या विविध भागात उकाड्याच्या प्रमाणात वाढ होत असली तरी देखील आगामी काही दिवसांत कमाल तापमानात काही प्रमाणात घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाच्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार नैऋत्य राजस्थानच्या भागावर चक्रीय स्थिती निर्माण झाली असून अरबी समुद्राच्या भागावर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे त्याच्या परिणामामुळे विदर्भाच्या काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असून राज्याच्या उर्वरित भागात कोरडे हवामान राहील. मात्र कमाल तापमानात फार मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता नाही.

गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागात कमाल तापमानात वाढ होऊन अनेक जिल्ह्यांत ३७ ते ४० अंश से कमाल तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. हिमालयात आणि आजूबाजूच्या परिसरात थंड हवा असूनही त्याचा फारसा परिणाम झाला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR