22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरविद्यार्थ्यांना पोलिसांचे आकर्षण; शस्त्रांचे कुतूहल

विद्यार्थ्यांना पोलिसांचे आकर्षण; शस्त्रांचे कुतूहल

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलिस स्थापना दिवस अर्थात ‘रेझिंग डे’च्या निमित्ताने जिल्हा पोलिस दलाच्या वतीने येथील जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवार दि. ४ जानेवारीपासून तीन दिवसीय शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांत शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी पोलिस यंत्रणा कसे कामाकाज करते, त्यांच्याकडे कोणकोणते विभाग आहेत. त्यांच्याकडे असलेल्या अत्याधुनिक शस्त्रांची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या मनात पोलिसां विषयीचे आकर्षण तर शस्त्रांचे कुतूहल असल्याचे त्यांच्या चेह-यांवरुन दिसून येत होते.

पोलिस अधीक्षक सोमय मुंडे व अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय जेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा संकुलात ४ ते ६ जानेवारी या कालावधीत पोलिस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात जिल्हा पोलीस दलाकडे असलेल्य अत्याधुनिक शस्त्रांचे प्रदर्शन मुलांचे आकर्षण व कुतूहलाचा विषय ठरत आहे. या प्रदर्शनात डॉग स्कॉड, इन्वेस्टिगेशन व्हॅन, बॉम्ब शोध व नाशक पथक, अत्याधुनिक वाहने, सायबर कक्ष, वाहतूक सुरक्षा, वायरलेस यंत्रणा, सुरक्षा हेल्पलाइन, असे अनेक विभागाचे स्टॉलस् भरवण्यात आले आहेत. प्रदर्शनाच्या ठिकाणी एकुण १० स्टॉलस् आहेत. पोलिस यंत्रणेची शालेय विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, हा या मागणचा उद्देश आहे. या प्रदर्शनाला जयक्रांती विद्यालय, श्री देशिकेंद्र विद्यालय, पोदार स्कूल, सरस्वती विद्यालय, उर्दू शाळांसह शहरातील जवळपास सर्वच शाळांतील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी भेट देऊन प्रदर्शनाची स्टॉलस्ची पाहणी केली. एवढेच नव्हे तर असंख्य जिज्ञासू विद्यार्थ्यांनी पोलीस काकांकडुन पोलिसांच्या विविध विभागांच्या कामाची माहिती घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR