33.3 C
Latur
Tuesday, June 3, 2025
Homeलातूरविद्यूत खांब व झाड कोसळले; नागरिकांची धावपळ 

विद्यूत खांब व झाड कोसळले; नागरिकांची धावपळ 

लातूर : प्रतिनिधी
सलग २० दिवस बेमोसमी पावसाने लातूर जिल्ह्यात मुक्काम ठोकला होता. दि. ३० व ३१ मे असे दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर बेमोसमी पाऊस पुन्हा दि. १ जून रोजी सक्रीय झाला आहे. रविवारी सायंकाळी ४.५५ वाजण्याच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी झाली आणि वादळी वा-यासह जोरदार पाऊस पडला. वादळी वारा व पावसाने शहरातील अनेक ठिकाणीची झाडं उलमडून पडली. एक विजेचा खांबही  कोसला. पावसाने पुन्हा लातूर शहराला दणका दिला.
यंदा उन्हाळ्यातच मे महिन्यातच पावसाळ्यासारखी स्थिती लातूर जिल्ह्यात निर्माण झाली. सलग २० दिवस पाऊस पडल्याने नागरिक, व्यापारी वैतागले होते. दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शेतक-यांनी खरीप हंगामाची तयारी सुरु केली होती. परंतू, रविवारी सायंकाळी पुन्हा जोरदार पावसाने तडाखा दिला. त्यामुळे शेतीच्या मशागतीच्या कामांना पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे.  लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व कामे करण्यात येत असली तरी शहरातील सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचत असल्याने वाहतूकीस अडथळा होत आहे. दरम्यान भूमिगत गटारींसाठी खोदकाम करण्यात येऊन वाहिन्या टाकण्यात आल्या. मात्र दबई व्यवस्थितरित्या न केल्याने आणि जागोजागी खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे अपघाताच्या घटनाही घडत असल्याचे पहावयास मिळत आहे.
रविवारी सायंकाळी वादळी वा-यासह जोरदार पाऊस पडला. या वा-यात आणि पावसात शहरातील महात्मा बसवेश्वर महाविद्यालय ते बालाजी मंदीर जाणा-या रोडवर एक मोठे झाड उलमडून पडले. तसेच विद्यूत खांबही रस्त्यावर कोसळला. पाऊस पडत असताना विद्यूत खांब कोसळल्याने या भागातील नागरिक भयभीत झाले होते. विद्यूत पुरवठा सुरुच असल्याने नागरिकांना मोठी दुर्घटना होण्याची भिती होती. परंतू, सुदैवाने  दुर्घटना टळली.  काही वेळाने महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विद्यूत पुरवठा बंद करुन कोसळलेला विद्यूत खांब रस्त्यावरुन काढला. याच रस्त्यावर एक मोठे झाडही उलमडून पडले. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने हे पडलेले झाड बाजूला केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR