छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मोठी बातमी समोर येत आहे, आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे.
दरम्यान, विद्रोही साहित्य संमेलनामध्ये एकूण २९ ठराव घेण्यात आले, त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, असा ठराव देखील घेण्यात आला आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यात आहे.
मराठवाड्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोहोचलेले गुन्हेगार यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी .चौकशी निपक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंर्त्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावे असा ठराव नाव न घेता संमत करण्यात आला .
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारी सुरुवात झाली. शहरातील आमखास मैदानावर सुरू झालेल्या या साहित्य संमेलनात परिसंवाद कवी संमेलने व्याख्यान गटचर्चा यांची रेलचल होती. दरम्यान ,सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून तसेच परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू करण्याचे पडसादही विद्रोही साहित्य संमेलनात दिसले .यात थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव मांडण्यात आला .
प्रस्ताव क्रमांक २०
मराठवाड्यातील परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीतील मृत्यू प्रकरणी दोषी पोलीस संतोष देशमुख कोण प्रकरणातील सत्ता वर्तुळाचे पोहोचलेले गुन्हेगार यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी चौकशी निपक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंर्त्यांनी मंत्रीपदापासून दूर राहावे .असे या प्रस्तावाचे स्वरूप होते .