मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.
महायुतीने प्रचारात आघाडी घेतली असून विधानसभा निवडणुकीसाठी घोषवाक्य देखील ठरवण्यात आले आहे. एकजूट महाराष्ट्रासाठी अभियान, विकासासाठी कल्याणासाठी हे घोषवाक्य घेऊन महायुती राज्यभर आपल्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे. ठाण्यातील महायुती मेळाव्यात भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याबाबत घोषणा केली.
‘एकजूट महाराष्ट्रासाठी अभियान, विकासासाठी कल्याणासाठी’ हे घोषवाक्य घेऊन महायुती राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे. ठाण्यातील महायुती मेळाव्यात भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याबाबत घोषणा केली. ठाण्यात आज महायुती समन्वयक समितीचा मेळावा सुरू आहे, या दरम्यान प्रसाद लाड यांनी ही घोषणा केली आहे. तसंच महायुतीकडून सोशल मीडिया आर्मी देखील तयार करण्यात येणार आहे. फेक नरेटिव्हला उत्तर देण्याचे काम ही सोशल मीडिया आर्मी करणार आहे.
२४ ऑगस्टला फोडणार प्रचाराचा नारळ
दरम्यान २४ ऑगस्टला विधानसभेसाठी महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. २४ ऑगस्टपासून प्रचाराला सुरुवात होणार आहे. ठाण्यातून पहिली प्रचार यात्रा निघणार आहे. तीन दिवस ही प्रचार यात्रा चालणार आहे. ठाणे, पालघर, नवी मुंबई अशी ही महायुतीची प्रचार यात्रा असणार आहे