24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रविधान परिषद पदवीधर आणि शिक्षक निवडणूक शिंदे गट स्वतंत्र लढणार

विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक निवडणूक शिंदे गट स्वतंत्र लढणार

मुंबई : २६ जून रोजी होणा-या विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर निवडणुका शिंदे सेना स्वतंत्र लढणार आहे. शिंदे सेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मुंबई पदवीधरमधून माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, मुंबई शिक्षकमधून शिवाजी शेंडगे आणि कोकण पदवीधरमधून शिंदे सेनेचे सचिव संजय मोरे आज सकाळी कोकण भवन येथे आपला निवडणूक अर्ज सादर करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

यापूर्वी भाजपने मुंबई पदवीधरसाठी किरण शेलार, मुंबई शिक्षकसाठी शिवनाथ दराडे आणि कोकण पदवीधरसाठी विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर उद्धव सेनेने पदवीधरसाठी माजी मंत्री डॉ. अनिल परब, तर शिक्षकमधून ज. मो. अभ्यंकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR