22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरविधी पळसापुरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार जाहीर

विधी पळसापुरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार जाहीर

लातूर : प्रतिनिधी
भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयतर्फे देण्यात येणा-या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी लातुरच्या विधी पळसापुरे यांना जाहीर झाला आहे. येत्या 12 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिक येथे पार पाडणा-या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

विधी पळसापूरे या माझा करिअर गाईड फाउंडेशनच्या संस्थापिका असून सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. गेल्या ८ वर्षापांसून विधी सातत्याने विविध विकास कामे करत असून, शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या नि:शुल्क करिअर मार्गदर्शनाचे कार्य त्या करत आहेत. या आधी २ ऑक्टोबर रोजी देशाच्या संसदेतील त्यांचे भाषण सबंध महाराष्ट्रात लोकप्रिय झाले होते. लातूरचे नाव देश पातळीवर पुन्हा एकदा गाजविल्या मुळे विधी व त्यांच्या आई, वडिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दि. ३० डिसेंबर रोजी उदगीर येथे झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात क्रीडा व युवक सेवा संचालनालयचे मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विधी पळसापुरे यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. या वेळी खासदार सुधाकरजी शृंगारे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR