20.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeक्रीडाविनेशला पाठिंबा देण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने विमानतळावर

विनेशला पाठिंबा देण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने विमानतळावर

नवी दिल्ली : भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट आज सकाळी देशात परतली. पॅरिसहून परतलेल्या विनेशचे दिल्ली विमानतळावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. विनेशला पाठिंबा देण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने विमानतळावर आले होते. त्याचवेळी साक्षी मलिक आणि बजरंग पुनियाने विनेशचे स्वागत केले असता विनेशला आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि ती भावूक झाली.

विनेश फोगट आज भारतात परतली. साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी दिल्ली विमानतळावर सर्व चाहत्यांसोबत विनेशचे स्वागत केले. त्यांच्या स्टारला पाठिंबा देण्यासाठी विमानतळावर गर्दी होती. विनेश आता दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरून थेट तिच्या बलाली या गावी जाणार आहे. यादरम्यान विनेशचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती यावेळी खूप भावूक झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. साक्षी मलिकला मिठी मारताना विनेश रडताना दिसत आहे. यावेळी विनेशने संपूर्ण देशवासियांचे खूप खूप आभार मानले. यावेळी विमानतळावर विनेश-विनेशच्या नावाने जयघोष करण्यात येत होता.

विनेश रौप्य पदकापासून वंचित राहिली

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये फ्रीस्टाइल कुस्तीच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोहोचल्याने विनेशचे रौप्य पदक निश्चित झाले होते. पण, अंतिम सामन्यापूर्वी १०० ग्रॅम जास्त वजनामुळे तिला स्पधेर्तून अपात्र ठरवण्यात आले. यानंतर कुस्तीपटूने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. या नंतर तिने अपात्र ठरवल्याबद्दल न्यायालयाकडे दाद मागितली मात्र तिला निराशा मिळाली तिचे अपील सीएएसने फेटाळून लावले. परिणामी तिला पदकाविना भारतात परतावे लागले. पण, विनेशने काल रात्री तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली, जी वाचून असे दिसते की ती निवृत्तीतून परतण्याचा विचार करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR