25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeक्रीडाविराटला सचिन-द्रविडच्या क्लबमध्ये सामील होण्याची संधी

विराटला सचिन-द्रविडच्या क्लबमध्ये सामील होण्याची संधी

नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यात उद्यापासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत दोन सामने खेळवले जाणार आहेत आणि हे दोन्ही सामने भारतासाठी खूप महत्त्वाचे आहेत. दरम्यान, या बांगलादेशविरुद्ध मालिकेत सर्वांच्या नजरा स्टार फलंदाज विराट कोहलीवर असणार आहेत. कारण विराट या मालिकेत खेळताना अनेक विक्रम आपल्या नावावर करू शकतो यासोबतच तो सचिन, गावस्कर आणि द्रविड यांच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. यासाठी विराटला केवळ १५२ धावांची गरज आहे.

दरम्यान, बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारताचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीर भारतीय संघाकडून चांगली तयारी करून घेत आहे, तर ब-याच काळानंतर कसोटीमध्ये पुनरागमन करणारा विराट देखील नेटमध्ये घाम गाळत आहे. बांगलादेशविरुद्ध कोहली शानदार फलंदाजी करताना दिसेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत कोहलीने या मालिकेत १५२ धावा केल्या तर तो भारताचे माजी दिग्गज सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि राहुल द्रविड यांच्या क्लबमध्ये सामील होईल. दरम्यान, विराट कोहलीचे बांगलादेशविरुद्ध उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. त्याने ६ सामन्यांच्या ९ डावांत ४३७ धावा केल्या आहेत. या काळात कोहलीने २ शतके झळकावली आहेत. चेतेश्वर पुजारा, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनी बांगलादेशविरुद्ध त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

या मालिकेत कोहलीला ९००० धावा पूर्ण करण्याची संधी
विराटने आतापर्यंत ११३ कसोटी सामने खेळले असून, त्यात त्याच्या नावावर ८,८४८ धावा आहेत. अशा परिस्थितीत आता कोहलीला आगामी मालिकेत ९००० धावा पूर्ण करण्याची संधी आहे. आतापर्यंत केवळ तीन भारतीय फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे. भारतासाठी, सुनील गावस्कर यांनी कसोटीत ९००० धावा पूर्ण केल्या आहेत, त्यानंतर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडने ९००० धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत विराट कोहलीने १५२ धावा केल्या तर अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय ठरेल.

कसोटीत ९००० धावा पूर्ण करणारे भारतीय खेळाडू

खेळाडूंचे नाव सामने धावा

सचिन तेंडुलकर २०० १५,९२१
राहुल द्रविड १६३ १३,२६५
सुनील गावस्कर १२५ १०,१२२
विराट कोहली ११३ ८,८४८

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR