लातूर : प्रतिनिधी
विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १७ येथील संत ज्ञानेश्वरनगर येथे महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र क्र. १२ ची सुरुवात करण्यात आली आहे. ट्वेंटीवन अॅग्री लि. च्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या हस्ते या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
ट्वेंटीवन अॅग्रीच्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विलासराव देशमुख फाउंडेशनच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. विलासराव देशमुख फाउंडेशन महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये एकूण ९६ महिलांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या प्रशिक्षणात महिलांना शिलाईच्या शिवनकामातील विविध पद्धती शिकवल्या जाणार आहेत. यावेळी संस्थेच्या समन्वयक संगीता मोळवणे, विक्रम बिराजदार, चंद्रज्योती बिराजदार, अमित जाधव, उर्मिला मुगळे, ट्रेनर प्रेमा ठाकूर, गोविंदराव उसनाळे, सुधाकर मुरमे, शैलेश तांबरवाडीकर, संस्थेचे सोशल प्लॅनर गजानन बोयणे आणि प्रभागातील महिला उपस्थित होत्या.