लातूर : प्रतिनिधी
विलास सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी कारखान्याचे संस्थापक चेअरमन राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील विलासराव देशमुख सहकार पॅनलच्या २१ उमेदवाराचे अर्ज अर्ज दाखल केले आहेत.
राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या युवा नेतृत्वात स्थापन झालेल्या विलास साखर कारखान्याने मागच्या २५ वर्षात उत्कृष्ट कार्य व व्यवस्थापनाची अनेक उच्चांक प्रस्तापीत करुन साखर कारखानदारी क्षेत्रात आदर्श निर्माण केला. या माध्यमातून लातूर तालुका व जिल्ह्यात आर्थिक क्रांती घडवली आहे. ग्रामिण जीवनमान उंचावले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, विद्यमान चेअरमन वैशाली विलासराव देशमुख, माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मावळत्या संचालक मंडळाने अत्यंत उत्कृष्टरीत्या काम करुन ऊसउत्पादक शेतकरी, कामगार, शेतमजूर यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी अत्यंत उत्तम काम केले आहे.
मांजरा परीवारात स्थापन झालेला आणि अत्यंत कडक शीस्तीच्या वातावरणात वाटचाल करीत असलेला विलास सहकारी साखर कारखान्याने एकुण २४ गळीत हंगामात ३६ पेक्षा अधिक राज्य आणि देशपातळीवरील पुरस्कार आणि पारीतोषीके मिळवली आहेत. नेहमीच आधुनीक तंत्रज्ञान आणि प्रयोगशीलतेचा अवलंब करीत उस उत्पादकांना अधिकांत अधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न या कारखान्याच्या माध्यमातून झालेला आहे. संचालक मंडळाने फक्त विश्वस्थांची भुमिका निभावल्यामुळे प्रत्येक सभासद शेतक-यांला हा कारखाना आपल्याचा मालकीचा असल्याचा विश्वास वाटतो आहे.
यावेळी कारखान्याच्या नेतृत्वाकडून संचालक मंडळासाठी उमेदवार निवडतांना अनुभवी आणि नवख्या उमेदवारांचा उत्तमरीतीने समावेश केला आहे. आतापर्यंतच्या संचालक मंडळातील ५ जुने संचालक, ८ विद्यमान संचालक तर ८ नवीन प्रतिनीधी यांचा या २१ उमेदवारात समावेश आहे. विलासराव देशमुख सहकार पॅनलमध्ये उमेदवारी मिळालेल्या सर्व उमेदवारांनी सहकार क्षेत्रातील मान्यवर नेते व पदाधिकारी यांच्यासह दि. १२ मार्च रोजी दुपारी माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील पुर्णाकृती पुतळयास अभिवादन करुन लातूर येथे उपविभागीय अधिकारी तथा निवडणुक अधिकारी रोहिणी न-हे विरोळे यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले.
उमेदवारी अर्ज दाखल करतांना उमेदवारांसोबत लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख आदिसह विद्यमान संचालक मंडळ व काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी यांच्यासह ऊसउत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते.