लातूर : प्रतिनिधी
सहकार चळवळ आणि विलास सहकारी साखर कारखाना ही शेती, शेतकरी आणि समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेमुळे आपण शेतक-यांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे आर्थिक सक्ष्मीकरण करीत आहोत. सहकारी संस्था ही शेतक-यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याचे साधन आहे आणि तिच्या माध्यमातून आपण समाजाचा सर्वांगीण विकास साधू शकतो अशा सहकार क्षेत्रातील संस्था अधिक मजबूत करण्यासाठी कार्यरत रहावे असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची बाभळगाव येथील निवासस्थानी रविवार दि. १६ मार्च रोजी विलास सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान काळजीवाहू संचालक मंडळ आणि विलासराव देशमुख सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी भेट घेतली. यावेळी साखर कारखान्यात काम करण्याची संधी दिल्याबद्दल संचालक मंडळाने तसेच संचालकपदासाठी उमेदवारी दिल्याबद्दल सर्व उमेदवारांनी आमदार देशमुख यांचे आभार मानले. यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सहकारी क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ऊसउत्पादक, सभासद शेतकरी यांच्यासाठी चांगले काम करण्याचे आवाहन केले.
त्यांनी सांगितले की, सहकार चळवळ, विलास सहकारी साखर कारखाना ही शेती, शेतकरी आणि समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची संस्था असून तिच्या माध्यमातून शेतक-यांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे आर्थिक सक्ष्मीकरण आपण करीत आहोत. या प्रसंगी उपस्थित सर्वांनी सहकारी क्षेत्रातील संस्था ज्या शेतक-यांसाठी आणि ग्रामिण भागासाठी काम करीत आहोत त्या अधिक मजबूत करण्यासाठी कार्यरत रहावे असे आवाहन केले.
या प्रसंगी माजी आमदार वैजनाथराव शिंदे, विद्यमान काळजीवाहू संचालक मंडळातील व्हा. चेअरमन रविंद्र काळे, गोविंद बोराडे, अनंतराव बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, नारायण पाटील, रंजीत पाटील, सुर्यंकांत सुडे, अम्रत जाधव, सुभाष माने, भारत आदमाने, दगडूसाहेब पडीले तसेच विलास साखर कारखाना निवडणुकीतील विलासराव देशमुख सहकार पॅनलेची उमेदवारी दिलेल्या नरसिंग बुलबुले, रसुल पटेल, गोवर्धन मोरे, तात्यासाहेब पालकर, हनुमंत पवार, नितीन पाटील, रामराव सांळुके, नेताजी देशमुख, सतिश शिंदे पाटील, लता रमेश देशमुख, दिपक बनसोडे, श्याम बरुरे, रमेश देशमुख आदी उपस्थित होते.