लातूर : प्रतिनिधी
विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी येथील साखर कारखान्यात गळीत हंगामात ऊत्पादीत झालेल्या २ लाख ५ हजार ५५५किं्वटल साखर पोत्याचे पूजन दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या साखर पोती पूजन कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, रंजीत पाटील, गोंिवद डुरे, सुर्यकांत सुडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर खाते प्रमुख, विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. या हंगामापूर्वी कमीत कमी कालावधीमध्ये कारखान्याचे आधुनिकीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मशिनरी आधुनिकीकरणामुळे विनाअडथळा गाळप होत असून कार्यक्षेत्रातील ऊसाचे वेळेवर गाळप होण्यास मदत झाली आहे. हंगामात वेळेत ऊसाची तोड करुन गाळपास येत असल्याने शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. हंगामाची नियोजनबद्ध वाटचाल चालु आहे.
पावसाचा ताण, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती यावर मात करुन हंगाम पार पाडावा लागत आहे. शेतक-यांच्या सर्व ऊसाचे वेळेवर गाळप करण्यासाठी विलास कारखाना सज्ज आहे, अशी माहीती व्हाईस चेअरमन रंिवद्र काळे व कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली आहे. विकासरत्न विलासराव देशमुख साहेब यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन व संस्थापक चेअरमन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखाना यशस्वीपणे वाटचाल करीत आहे.
विलास साखर कारखाना येथे गळीत हंगाम सुरु होवून ४५ दिवस झाले आहेत. या गळीत हंगामात आज अखेर २ लाख २ हजार मे. टन पेक्षा अधिक ऊसाचे गाळप आणि २ लाख ५ हजार ५५५किं्वटल शुभ्र दाणेदार साखरेचे उत्पादन झाले असून आज अखेर सरासरी साखर ऊतारा १०.३५ टक्के इतका आहे. गळीत हंगामात उत्पादीत झालेली साखर दर्जेदार व्हावी यासाठी विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. सहविजनिर्मीती प्रकल्पात ८६ लाख ४२ हजार युनीट विजनिर्मीती झाली आहे तर आसवनी प्रकल्पातून १७ लाख ४७ हजार लीटर आरएसची निर्मीती झाली आहे. तसेच दि. १० डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे २५०० रुपये प्रती मे.टन प्रमाणे ऊस बिल संबंधित ऊस पुरवठादार यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहे.
कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांचा आणि तांत्रीक कार्यक्षमतेचा चांगला वापर करून कमी वेळेत गाळप केले जात आहे. हंगामाची वाटचाल चांगली सुरू असून सभासद, शेतक-यांच्या ऊसाचे वेळेवर गाळप करून साखर ऊताराही चांगला ठेवला या बददल राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी सर्वांचे अभिनंदन करून हंगामाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सदरील प्रसंगी कारखाना कार्यक्षमतेने चालविण्यात येत असल्याने संचालक मंडळाच्या वतीने सर्व खातेप्रमुख व विभागप्रमुख यांचा सत्कार कारण्यात आला.
गळीत हंगामात सुरूवातीलाच ऊस गाळपात आघाडी घेऊन या हंगामात २ लाख ५ हजार ५५५किं्वटल साखर उत्पादीत केल्या बददल माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, संस्थापक चेअरमन आमदार अमित विलासराव देशमुख, चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख व लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी ऊस उत्पादक शेतकरी, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे धिकारी, कर्मचारी वर्ग, वाहतूक ठेकेदार, तोडणी मंजूर व कंत्राटदार या सर्वांचे अभिनंदन केले.