21.3 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमुख्य बातम्याविशाल अग्रवालसह तिघांना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी

विशाल अग्रवालसह तिघांना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : वृत्तसंस्था
पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण अपघातप्रकरणी आज (बुधवारी) अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवाल यांना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांना सुद्धा २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना आज पुणे पोलिसांकडून न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. यावेळी सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल यांची ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे.

पुणे सत्र न्यायालयाने आज या चार जणांना कोठडी सुनावली आहे. १९ तारखेला पुण्यातील कल्याणीनगर भागात भीषण अपघात झाला होता. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला होता.

कोर्टात काय झाला युक्तीवाद : विशाल अग्रवाल यांना चौकशीसाठी पुणे पोलिसांकडून ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती. मात्र, न्यायालयाने ती अमान्य करत विशाल अग्रवालसह अन्य तीन आरोपींना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुलगा अल्पवयीन असतानाही त्याला कार चालवायला दिली तसेच तो दारू पितो हे माहिती असतानाही त्याला पार्टीला जाण्यास परवानगी दिली. या कारणांमुळे विशाल अग्रवाल यांच्यावर बाल न्याय अधिनियमाच्या ७५ आणि ७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत बोलताना वकिल असीम सरोदे म्हणाले, विशाल अग्रवाल यांनी मुलाकडे लक्ष दिले नाही. गाडीचे रजिस्ट्रेशन केलेले नव्हते. गाडीवरती नंबर टाकण्यात आलेला नव्हता. आपल्या मुलाकडे परवाना नाही हे माहिती असतानाही त्यांनी मुलाला गाडी चालवायला दिली. मुलाचे वय १८ वर्ष नसताना त्याला बार, पबमध्ये जाऊ देणे, हे देखील चांगल्या पालकांचे लक्षण नाही. त्यामुळे ज्युवीनाईल जस्टीस अ‍ॅक्टनुसार त्यांनी आपल्या मुलाकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे हा अपघात घडलेला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR