लातूर : प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (रकफ- रस्रीू्रं’ कल्ल३ील्ल२्र५ी फी५्र२्रङ्मल्ल) राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात सुध्दा मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण चे पूर्व तयारी सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक मतदाराने आपले नाव २००२ च्या मतदार यादीतील माहितीसोबत मॅपिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. सदरील मॅपिंग करणे करिता ३८८ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नियुक्ती करण्यात आली असून काम प्रगतीपथावर सुरू आहे.
मनपा क्षेत्रातील जवळपास ७० टक्के मतदारांनी या प्रक्रियेत सहभाग घेत मतदार यादीतील आपले नाव सुनिश्चित केले आहे. अद्यापही ३० टक्के मतदार यात सहभागी झालेले नाहीत. त्याकरिता राहिलेले मतदार यांच्या मदती करिता लातूर शहर महानगरपालिका येथे एसआयआर स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असून टोल फ्री १८००२३३१३८८ नंबर सुधा कार्यान्वित करण्यात आला आहे.
मतदारांना या क्रमांकावर संपर्क साधून चौकशी करता येईल, तसेच आपल्या भागाचे बीएलओ यांची माहिती मिळेल. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत हा कक्ष कार्यान्वित राहणार आहे. तरी ज्या मतदारांनी अद्याप या प्रक्रियेत सहभाग नोंदविलेला नाही त्यांनी लवकरात लवकर आपले भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांशी संपर्क साधण्याचे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे व उपायुक्त तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी डॉ. पंजाब खानसोळे यांनी केले आहे.
















