37.8 C
Latur
Saturday, March 29, 2025
Homeमहाराष्ट्रविहिरीत ट्रॅक्टर पडल्याने २ ठार

विहिरीत ट्रॅक्टर पडल्याने २ ठार

नंदुरबार : नवापूर तालुक्यात विहिरीचे खोदकाम सुरू असताना एक भीषण अपघात घडला. खोदकाम करताना अंदाज चुकल्याने ट्रॅक्टर २० फूट विहिरीत कोसळला. या ट्रॅक्टरखाली दबल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. विश्वास जोगु गावीत (वय २३, रा. वागदी, ता. नवापूर) आणि कृष्णा काशिराम गावीत (वय ३३, रा. हळदाणी, ता. नवापूर) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

नवापूर तालुक्यातील गताडी शिवारातील धरणाजवळ रोजण्या गावीत यांच्या शेतात नवीन विहिरीचे खोदकाम सुरू होते. या कामासाठी ट्रॅक्टर लावण्यात आले होते. सोमवारी रात्री काम आवरल्यानंतर विश्वास गावीत हा तरुण विहिरीजवळून ट्रॅक्टर घेऊन चालला होता. यावेळी त्याचा मित्र कृष्णा गावीत हा देखील ट्रॅक्टरवर होता. विहिरीजवळून जात असताना अंदाज चुकल्याने ट्रॅक्टर २० फूट विहिरीत कोसळला. ट्रॅक्टरखाली दबून विश्वास आणि कृष्णा यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेत जेसीबीच्या सहाय्याने विहिरीत पडलेले ट्रॅक्टर आणि मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने परिसरात अंधार होता. यावेळी परिसरात शोककळा पसरली. याबाबत विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR