लातूर : प्रतिनिधी
औसा तालुक्यातील सेलू येथील शेतक-याने डिपीसाठी डिमांड भरले होते. शेतक-याच्या शेतात डिपी न देता शेतक-याला ७ हजार २०० रूपयांचे विज बिल देण्याचा प्रताप महावितरणकडून घडला आहे. या प्रकरणी सदर शेतक-यांने न्याय देण्यासाठी निलंगा येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यास पत्राद्वारे मागणी केली आहे.
औसा तालुक्यातील सेलू येथील कृष्णदास बाबुराव दंडे स्वत:च्या शेतात स.नं. २३३ मध्ये स्वतंत्र डि. पी. मागणीसाठी दि. ८ जून २०२० रोजी डिमांड भरली होती. परंतु शेतात डि. पी. साठी कोणतीही कार्यवाही झाली नाही. शेतात कसल्याही प्रकारचे विजं कनेक्शन आलेले नाही. डिमांड भरल्या नंतर त्यांच्या नावाने डि.पी. मंजूर झाला. तो डि. पी. दंडे यांना न देता परस्पर एमएसईबी मार्फत त्याची विल्हेवाट लावण्यात आली. शेतात कुठलेही विज कनेक्शन नसतांना दि. १५ जानेवारी २०२४ रोजी ७ हजार २०० रूपयांचे दंडे यांच्या नावाने विज बिल आले आहे. या प्रकराणी मला योग्य तो न्याय मिळावा, अशी मागणी निलंगा येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.