22.3 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeवैद्यनाथ साखर कारखाना १४ नोव्हेंबरला सुरू होणार

वैद्यनाथ साखर कारखाना १४ नोव्हेंबरला सुरू होणार

 

अंबाजोगाई : प्रतिनिधी

दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेला पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ साखर कारखाना अखेर सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: पंकजा मुंडे यांनी बीडमधील जाहीर सभेतून कारखान्याबाबत गुड न्यूज दिली.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये पंकजा मुंडे यांनी ही घोषणा केली. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखान्याची उभारणी केली. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर कारखान्याचे सूत्र पंकजा मुंडे यांनी हाती घेतले होते.

मध्यंतरी दुष्काळादरम्यान वैद्यनाथ साखर कारखाना आर्थिक संकटात सापडला परिणामी तो बंद होता. परंतु अखेर हा वैद्यनाथ साखर कारखाना पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. येत्या १४ तारखेला वैद्यनाथ साखर कारखाना सुरु होणार आहे आणि २५ तारखेला मोळी टाकण्याचे काम होणार आहे, असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR