लातूर : प्रतिनिधी
विलास सहकारी साखर कारखाना, वैशालीनगर, निवळी ता. लातूर या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या गळीत हंगामासाठी होत असलेली ऊसतोडणीची पाहणी आणि सभासद, ऊस उत्पादक शेतक-यांशी संवाद सांधण्यासाठी चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख आणि सर्व संचालकांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन भेट देत आहे. या निमित्ताने सभासदाच्या ऊसतोडणीत अडचण होवू नये, गळीत हंगामातील ऊस गाळपाची कार्यक्षमता वाढवी यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी दि. ४ डिंसेबर रोजी कारखाना कार्यक्षेत्रातील वासनगाव येथे आशाबाई व्यकंटराव जमादार, गंगापूर येथे दिनकर रामराव शिंदे, सावरगाव येथे उर्मीला वसंतराव शिंदे, टाकळी शि. येथे किशोर दिलीप बचाटे, यांच्या तोडणी होत असलेल्या ऊस प्लॉटची जाऊन पाहणी केली. यावेळी तोडणी होत असलेला ऊस तसेच या भागात लागवड ऊसाची सदयाची परिस्थिती या बाबत कारखान्याचे सभासद आणि ऊस उत्पादकांशी यांच्याशी संवाद साधुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, दत्तात्रय बनसोडे, शिलाताई फुटाणे, संचालक सर्वश्री गोविंद डूरे, गुरुनाथ गवळी, संजय पाटील, अनंत बारबोले, रमेश थोरमोटे (पाटील), बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, भारत आदमाने, हणमंत जाधव, मदन पाटील, सुखदेव खुणे, डॉ. सतीष कानडे, बिभीषण शिंदे, आशाताई शिंदे, (सरपंच) तानाजी फुटाणे, पुष्पांजली भुसे, शामराव ढगे, तुळशीराम शेळके, संतोष दगडे पाटील, गणेश रामराव ढगे, सईन माणिक झेंटे, माधव कदम, नंदकुमार पाटील, राजेभाऊ बचाटे, ज्ञानेश्वर बचाटे, शिवाजी शेळके, नारायण शेळके, श्याम शेळके, ज्ञानदेव तुमकुटे, ज्ञानेश्वर दगडे, शेषराव पाटील, चंद्रकांत टेकाळे, गोविंद कदम, दत्तात्रय कदम, गुणवंत बचाटे, सचिन अच्युतराव शिंदे, वसंतराव शिंदे, नेताजी टेकाळे, लक्ष्मण शिंदे, महेंद्र श्यामराव मुळे, प्रभाकर गवळी, अशोक लोखंडे, उमाकांत लोखंडे, विजयकुमार लोखंडे, रमाकांत आडसुळे, दिनकर इंगळे, गजेंद्र घुटे, नंदू नागटिळक, जालिंदर घुटे आदी उपस्थित होते.