लातूर : प्रतिनिधी
येथील व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेच्या वतीने येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ७ वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ दि. १० मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर मंडप उभारणी शुभारंभ माजी आमदार बब्रुवान खंदाडे, यशवंत नागरी सहकारी बँकेचे चेअरमन प्रा. सुहास पाचपुते, पत्रकार अशोक हनवते, नेताजी बादाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून मंडप उभारणीच्या शुभारंभ करण्यात आला. या प्रसंग्ी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
















