27.1 C
Latur
Thursday, May 8, 2025
Homeमहाराष्ट्रव-हाडी मंडळींवर केला मधमाश्यांनी हल्ला

व-हाडी मंडळींवर केला मधमाश्यांनी हल्ला

नारायणगाव : जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात असलेल्या खडकुंबे गावातील लग्नसोहळ्यात आग्या मोहळातील मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात १९ व-हाडी जखमी झाले.

या जखमींमध्ये ३ लहान मुलांचा समावेश असून त्यातील एक बालक गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी ( दि. ०६) दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

दरम्यान, १९ जखमींपैकी १० जण जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून ७ जणांवर उपचार करून सोडण्यात आले आहे. तर ७ जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR