26.7 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeलातूरशंभू राजांच्या बलिदानाने जिजाऊंच्या लेकींना हुंदके दाटले

शंभू राजांच्या बलिदानाने जिजाऊंच्या लेकींना हुंदके दाटले

लातूर : प्रतिनिधी
स्वराज्य रक्षणासाठीची निष्ठा शेवटच्या श्वासापर्यंत जगलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाची अन् त्यांच्या बलिदानाची गाथा पहाताना शिवजंयती दिनी पीव्हीआरमध्ये उपस्थित जीजाऊंच्या लेंकीना आपले हुंदके आवरता आले नाहीत. फंदी फितूरीने दगाबाजी करीत  करण्यात आलेल्या घात अन् क्रुर आघाताप्रति या लेकींच्या मनात  ज्वालाही जागला. निमित्त होते शिवजंयतीच्या औचित्यावर सुमारे २५० महिलांनी एकत्र येत छावा चित्रपट पाहिल्याचे.
छत्रपती शिवराय व छत्रपती शंभू राजांची जीवन गाथा हा अखंड प्रेरणेचा स्त्रोत आहे, हे ओळखून येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. आम्रपाली अभयसिंह देशमुख यांनी शिवजंयती दिनी महिलांनी एकत्रीतपणे छावा चित्रपट पहाण्याचे ठरवले. तथापि त्यास वेळ फारच कमी होता व एवढ्या वेळेत एवढ्या संख्येत महिलांना एकत्र आणणे तसे कठीण व कसरतीचे होते. तथापि डॉ. देशमुख यांनी समाजमाध्यमाचा मोठ्या कल्पकतेने उपयोग करीत त्यावरुन आपली इच्छा व्यक्त केली व त्यास अपेक्षापल्याड प्रतिसाद मिळाला. सुमारे २५० महिलांनी नोंदणी केली. शिवजयंती दिनी सकाळी आठचा शो बुक करण्यात आला.
मराठमोळ्या पोशाखात सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात  महिला जमल्या. तिथे त्यांना फेटे बांधण्यात आले. त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन केले. एका बाल कलाकाराने शिवगर्जना केली तर एका भगिणीने पोवाडा सादर केला त्यांनंतर त्या आपल्या दुचाकी घेवून पीव्हीआर सिनेमाकडे मार्गस्थ झाल्या. एकाच वेळी एकाच दिशेने मार्गस्थ झालेल्या महिला पहाता जणू दुचाकी रॅलिचा भास होत होता. पीव्हीआरमध्येही  त्यांनी शिवप्रतिमेचे पुजन केले व त्या चित्रपटगृहात गेल्या. त्यांनी छावा पाहिला अन त्यांच्या डोळ्यांत गंगा अवतरली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR