33.1 C
Latur
Saturday, March 1, 2025
Homeमहाराष्ट्रशनि शिंगणापूरच्या शनिला आजपासून ब्रँडेड तेलानेच अभिषेक

शनि शिंगणापूरच्या शनिला आजपासून ब्रँडेड तेलानेच अभिषेक

अहिल्यानगर : प्रतिनिधी
शनि शिंगणापूरच्या शनिदेवाला आजपासून ब्रँडेड तेलाचाच अभिषेक स्वीकारला जाणार आहे. शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी शनि शिंगणापूरच्या देवस्थानाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

दरम्यान, गेल्या १५ फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर येथील प्रसिध्द शनि शिंगणापूर येथील शनि देवाला इथून पुढे शुद्ध तेलाचा अभिषेक करण्याचा निर्णय शनि शिंगणापूरच्या देवस्थानाकडून घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे. शनि शिंगणापूरच्या शनि देवाला भाविकांकडून तेलाचा अभिषेक किंवा तेल अर्पण करण्यात येत असते. दरम्यान, शुद्ध आणि ब्रँडेड तेलच फक्त शनि देवाला वाहण्याचा विश्वस्त मंडळाकडून निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

शनि शिंगणापूर देवस्थानाने आपला निर्णय जाहीर करताना म्हटले की, साधे तेल केमिकलयुक्त असल्यामुळे शनि देवाच्या शिळेवर (शनि चौथ-यावर मूर्ती नसून दगडाची स्वयंभू शिळा आहे) परिणाम होत आहे. अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल, सुटे तेल किंवा मिश्रित तेल आणून अभिषेक करत असतात. मात्र, अन्न व भेसळ तपासणी अहवालांनुसार असे आढळले की, काही तेलांमध्ये भेसळ असल्यामुळे शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होत आहे. त्यामुळे शनिदेवाच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR