27.7 C
Latur
Wednesday, July 3, 2024
Homeलातूरशब्दांकित साहित्य मंचावर झाली श्रावण सरींची बरसात 

शब्दांकित साहित्य मंचावर झाली श्रावण सरींची बरसात 

लातूर : प्रतिनिधी
शब्दांकित साहित्य मंचद्वारा कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. काव्य संमेलनाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. अतिशय देखण्या आणि दिमाखदार कवी संमेलनात श्रावण सरींची बरसात झाली. त्यात रसिक श्रोते चिंब झाले.
या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवियित्री निलिमा देशमुख होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ योग शिक्षिका कुंदाताई टेकाळे यांची उपस्थिती होती. कुंदाताई टेकाळे यांनी करो योग, रहो निरोग, असा संदेश आपल्या भाषणात दिला. रिमझिम पावसात श्रावण सरी काव्यरुपात बरसत होत्य. आज बुंदोने पैंगाम भेज कर, बादल ने शोर मचाया है, खतम हुआ इंतजार, आज मन भावन सावन आया है!, स्वाती जोशी यांच्या बहारदार कवितेने सुरुवात झाली वृषालीताई पाटील यांनी, मेघ जमले आभाळी, चढे रंग पावसाळी, बळी विणे स्वप्न जाळी, उजवण्या लेकीबाळी, सख्या पावसा पावसा स्वप्नी एकदा तू यावे, चिंब भिजल्या वेलींनी, मोर अंगी थिरकावे. उषाताई भोसले यांच्या या कवितेला टाळ्यांच्या कडकडात दाद मिळाली. डॉ. नयन राजमाने यांच्या, येई मनात दाटूनी आसवांचा ग बहर, मखमली आयुष्याला, नको लावू ग नजर. प्रत्येक कवितेला टाळ्यांच्या कडकडात दाद मिळत होती.
या श्रावण सरी कवयित्री संमेलनाला शब्दांकित साहित्य मंचच्या संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नयनताई राजमाने, अध्यक्षा विजयाताई भणगे व सचिव उषाताई भोसले यांची विशेष उपस्थिती होती. डॉ. नयन भादुले-राजमान यांनी उत्तम आयोजनाबद्दल शब्दांकित साहित्य मंच सदस्य शीला कुलकर्णी यांचे अभिनंदन करत भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकला. प्रास्ताविक उषाताई भोसले यांनी अतिशय सुंदर रित्या मांडले. तसेच कवयित्री संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन तहेसीन सय्यद यांनी केले. शीला कुलकर्णी यांनी आभार मानले. या कवियित्री संमेलनाला मालिनी कुलकणी, उमा कुलकर्णी, स्वाती देशपांडे, स्वाती जोशी, सत्यशीला कलशेट्टी यांच्यासह रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR