29.5 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeमहाराष्ट्रशरद पवार गटाचे आमदार बापू पठारे शिवनेरीवर

शरद पवार गटाचे आमदार बापू पठारे शिवनेरीवर

अजित पवार गटात जाणार?

पुणे : प्रतिनिधी
शिवजयंतीनिमित्त आज शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी येथे शरद पवारांचे आमदार बापू पठारेही दिसून आले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९५ वी जयंती आहे. संपूर्ण राज्यात शिवबांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान म्हणजेच पुण्यातील किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. मात्र, या सोहळ्यात एक चेहरा असा दिसला ज्यांना पाहून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. ते म्हणजे शरद पवारांचे आमदार बापू पठारे.

शरद पवारांचे पुण्यातील एकमेव आमदार बापू पठारे आज शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंती सोहळ्यात दिसून आले. इतकेच नाही तर ते शासकीय कार्यक्रमात मंचावरही दिसून आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शिवनेरीवरील शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बापू पठारे यांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली. बापू पठारे हे अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच आज ते उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत एका व्यासपीठावर दिसून आल्याने ते खरंच शरद पवारांची साथ सोडणार असल्याची शक्यता बळावली आहे.

शिवनेरी किल्ल्यावर आज शासकीय शिवजयंतीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री, तसेच मुख्यमंत्री उपस्थित राहणार हे ज्ञात असूनही बापू पठारे हे कार्यक्रमात आले होते. यावेळी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटताना दिसून आले. तसेच, ते मंचावरही उपस्थित होते. मंचावर ते अजित पवार यांच्या मागे बसलेले दिसून आले. मतदारसंघातील कामानिमित्त भेट घेतल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR