29.1 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवार पोहोचले मस्साजोग गावात

शरद पवार पोहोचले मस्साजोग गावात

बीड : बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनेचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातील हिवाळी अधिवेशनातही उमटल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उतरले असून बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणेंना घेऊन ते मस्साजोग गावात पोहोचले आहेत. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांसोबत ते चर्चा करत असून या प्रकरणी ते काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण तापले आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधिमंडळात या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि आरोपींना तात्काळ अटक व्हावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा आरोप करण्यात येत आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीच्या खासदारांनी बीड जिल्ह्यातील सरपंच हत्येप्रकरणी संसदेच्या मकरद्वारावर आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आम्ही आंदोलन केले. या घटनेमागचा मास्टरमाईंड शोधून त्याला शिक्षा व्हावी, खुनाचा कट कोणी रचला याची माहिती पोलिसांनी दिली पाहिजे. पीएसआयला निलंबित केले. त्याला सहआरोपी केले पाहिजे ही माझी मागणी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR