32.7 C
Latur
Wednesday, May 7, 2025
Homeलातूरशहरकर गुरुजी यांना प्रशासनातर्फे श्रद्धांजली 

शहरकर गुरुजी यांना प्रशासनातर्फे श्रद्धांजली 

लातूर : प्रतिनिधी 
येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, आदर्श शिक्षक जीवनधर सखाहरी शहरकर यांचे दि. १३ मे रोजी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. उपविभाीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे यांनी शहरकर गुरुजी यांच्या निवासस्थानी जाऊन शहरकर गुरुजी यांना लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जीवनधर शहरकर गुरुजी यांच्या निधनाचे वृत्त कळताच लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे यांनी शहरकर गुरुजी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी प्रभारी जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी तानाजी घोलप यांनी स्व. शहरकर गुरुजी यांच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे यांनी शहरकर गुरुजींच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. शहरकर गुरुजी यांच्या इच्छेनूसार त्यांच्या पार्थिवाचे येथील एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान करण्यात आले. तत्पुर्वी त्यांच्या नेत्रदानाचीही प्रक्रिया पार पडली.   शहरकर गुरुजी यांच्या निधनाचे वृत्त कळाल्यानंतर शहरातील पत्रकार, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवरांनी शहरकर गुरुजींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
ज्येष्ठ पत्रकार शहरकर गुरुजीच्या कार्याची आठवण कायम राहिल: माजी मंत्री दिलीपराव देशमुख 
येथील जेष्ठ पत्रकार व ज्येष्ठ नागरिक, आदर्श शिक्षक, थोर स्वातंत्र्य सैनिक म्हणून लातूरकरांना परिचित असणारे जुन्या पिढीतील हाडाचे पत्रकार, शिक्षक, समाजवादी विचार असलेले जीवनधर शहरकर गुरुजी यांचे निधन झाल्याची वार्ता कळाली मनाला दु:ख वाटले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ति मिळावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करुन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी शहरकर गुरुजींच्या कार्याची आठवण कायम राहिल, अशी भावना व्यक्त केली.  सन १९८० ते ९० च्या काळापासून दिवंगत जीवनधर शहरकर गुरुजी यांचा आमचा देशमुख कुटुंबाशी स्नेह होता. ते राजस्थान शाळेत शिक्षक होते.
 त्या काळी लातूरला फार कमी वृत्तपत्र यायचे तेव्हा ते शहरकर गुरुजी लोकसत्ताचे वार्ताहर होते  तेव्हापासून आजतागायत त्यांचा आमचा स्नेह राहिला. अतिशय रोखठोक लिखाण ते करायचे. पत्रकारिता, शिक्षकी पेशा, खांद्यावर शबनम बॅग त्यांचेकडे नेहमी असायच. कुठलाही कार्यक्रम असो ते हजर राहायचे. एक तत्वनिष्ठ पत्रकार, आदर्श शिक्षक, थोर स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी विचार असलेले एक उत्तुंग व्यक्त्तिमत्व असलेल्या शहरकर गुरुजींच्या निधनाने  उत्तुंग व्यक्त्तिमत्व, तत्वनिष्ठ ज्येष्ठ पत्रकारला आज आपण मुकलो आहेत. हाडाचे शिक्षक, तत्वनिष्ठ पत्रकार  म्हणुन त्यांनी केलेल्या  कार्याची आठवण कायम लातूरकरांच्या स्मरणात राहील.
शहरकर गुरुजीचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी : माजी मंत्री आमदार देशमुख
लातूर येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, आदर्श शिक्षक, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर शहरकर गुरुजी यांचे निधन झाल्याचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पन करुन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्त्ती मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना केली. ज्येष्ठ पत्रकार जीवनधर शहरकर गुरुजी यांनी केलेल्या पत्रकारीतेमुळे त्यांना तत्वनिष्ठ पत्रकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी आदर्श शिक्षक म्हणून केलेल कार्य नव्या पिढीसाठी कायम स्मरणीय आणि प्रेरणादायी राहील अशा भावना आमदार देशमुख यांनी व्यक्त केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR