22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeलातूरशहरातील आगीच्या घटनेतील नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

शहरातील आगीच्या घटनेतील नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील साळे गल्ली परिसरात सिद्धेश्वर मंदिराकडे जाणा-या ६० फुटी रस्त्यावरील ६ दुकानांना काल रात्री आग लागून मोठे नुकसान झाले, आग लागल्यासंबंधी माहिती मिळताच माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी महापालिका प्रशासनाशी संपर्क साधून त्वरित आग आटोक्यात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, याप्रसंगी संबंधित दुकानदाराशी संपर्क साधून त्यांनाही धीर दिला आहे. नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळण्याच्या दृष्टीने त्वरित पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. त्यानूसार शनिवारी सकाळी महसूल प्रशासनाने नुकसानाचे पंचनामे केले आहेत.
या आगीच्या घटनेच्या घटनेत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अपदग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळेल या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना महसूल विभाग व तहसीलदारांना दिल्या आहेत, काँग्रेस पदाधिका-यांनी  आपतग्रस्तांना धीर देऊन त्यांच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे व्हावे या दृष्टीने प्रयत्न करण्यासही सांगितले होते. शनिवारी सकाळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड किरण जाधव, पक्षाचे पदाधिकारी युनूस मोमीन, तबरेज तांबोळी, महेश काळे, करीम तांबोळी, पिराजी साठे, जाफर शेख यांनी ज्यांची दुकाने जळाली आहेत ते शेख फैयाज हुसैन, सैयद शहाबुद्दीन शूजाउद्दीन, तांबोळी शकील सुदबोद्दीन,  पठान इरफान शब्बीर, इमरान गोसोद्दीन पटवेकर, रहीम अमीर शेख यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला आहे. महसूल विभागाचे नायब तहसीलदार, भीमाशंकर बेरुळे मंडळ अधिकारी, राम झाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन आगीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत.
या पदग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत त्यामुळे शहरात आणि ग्रामीण भागात पुन्हा आगीच्या घटना घडू नयेत यासाठी महसूल महापालिका पोलीस प्रशासनाने सजग रहावे, त्यासंबंधी जागृतीसाठी उपाययोजना कराव्यात, नागरिक व दुकानदार यांनीही आवश्यक ती काळजी घ्यावी, व्यापारी प्रतिष्ठाने व उद्योगाच्या ठिकाणी आग प्रतिबंधक यंत्रणा बसवून घ्याव्यात, असे आवाहनही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR