29.3 C
Latur
Tuesday, May 6, 2025
Homeलातूरशहरातील १७० ग्रीन बेल्ट्स, ओपन स्पेसचे सर्व्हेक्षण पूर्ण

शहरातील १७० ग्रीन बेल्ट्स, ओपन स्पेसचे सर्व्हेक्षण पूर्ण

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेने एक विशेष मोहिम हाती घेतली आहे.  या मोहिमेअंतर्गत शहरातील १७० ग्रीन बेल्ट्स, ओपन स्पेसचे सर्वेक्षण पुर्ण करण्यात आले आहे.  लातूर शहरातील विविध भागातील ले-आऊटमध्ये  नागरीकांच्या सार्वजनिक वापरासाठी ग्रीन बेल्टन, ओपन स्पेस उपलब्ध  आहेत, ले-आउटचे निर्माण करताना मूळ विकासकाने एकूण जमिनीच्या १० टक्के् जागा स्थानिक ले-आउटधारक रहिवाशांच्या सार्वजनिक वापरासाठी खुली (ओपन स्पेस) सोडणे क्रमप्राप्त आहे, त्या­ दृष्टीने ओपन स्पेसचे रेकॉर्ड तयार करण्याची संकल्पना उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी मांडली होती. त्याअनुषंगाने दि. ५ मे रोजी उपायुक्तांनी मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या ग्रीन बेल्ट विशेष सर्वेक्षण मोहिमेची सविस्तर आढावा बैठक घेतली व पुढील टप्प्यातील सर्वेक्षणाच्या संबंधी मार्गदर्शक सूचना केल्या.
सदर विशेष मोहिमेसाठी ९ पथकांची स्थापना करण्यात आलेली होती. मालमत्ता विभागांतर्गत केल्या जाणा-या या सर्वेक्षणात जवळपास १७० ग्रीन बेल्ट, ओपन स्पेस चे सर्वेक्षण झालेले असून, सर्व ग्रीन बेल्ट, ओपन स्पेसचे डिजिटल मॅपिंग होणार आहे.  अद्याप न सापडलेल्या ग्रीनबेल्ट, ओपन स्पेस जागांचा शोध घेणे, अतिक्रमण असलेल्या जागांवर यथायोग्य कारवाई करून सुरक्षित करणे व त्या जागांना पुढे नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देऊन शहराच्या विकासास चालना देण्याचा मानस मनपाचा असल्याचे उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी स्पष्ट केले. सोबतच नागरिकांनी पुढाकार घेऊन ग्रीनबेल्ट, ओपन स्पेस बद्दलची माहिती त्यांच्याकडे असल्यास मालमत्ता विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR