23.8 C
Latur
Friday, May 23, 2025
Homeमहाराष्ट्रशालार्थ आयडी घोटाळा, वैशाली जामदार अटकेत

शालार्थ आयडी घोटाळा, वैशाली जामदार अटकेत

या आधी चौकशी समितीच्या अध्यक्षांना अटक
५८० अपात्र शिक्षकांना पगार
नागपूर/छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी नागपूर पोलिसांतर्फे गठित केलेल्या एसआयटीने आणखी एका मोठ्या अधिका-याला अटक केली असून, नागपूर शिक्षण विभागाच्या माजी उपसंचालक आणि छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांना शुक्रवारी अटक केली. या घोटाळ््यात अटक झालेल्या या पहिल्या महिला अधिकारी आहेत. या प्रकरणी या आधी गुरुवारी थेट चौकशी समितीचे अध्यक्ष चिंतामण वंजारीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुस-या दिवशी आणखी एक बडा मासा गळाला लागला.

नागपूर शालार्थ आयडी घोटाळा आणि अपात्र शिक्षकांच्या भरती प्रकरणी या अगोदर गुरुवारी राज्य शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष आणि माजी शिक्षण उपसंचालक चिंतामण वंजारी यांना अटक करण्यात आली. वंजारी हे या प्रकरणाच्या चौकशी समितीचे अध्यक्ष आहेत. बनावट शालार्थ आयडी तयार करून अपात्र शिक्षकांना पगार मंजूर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चिंतामण वंजारी प्राथमिक शिक्षण अधिकारी असताना हा घोटाळा सुरू झाल्याचे तपासात उघड झाले. आधी माजी शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांना बुधवारी अटक करण्यात आली. त्यानंतर वंजारी यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांना गुरुवारी अटक करण्यात आली. दरम्यान, वंजारीला २७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

या प्रकरणी आतापर्यंत एकूण १३ जणांना अटक करण्यात आली. त्यापैकी पाच ते सहा जणांना जामिनावर सोडण्यात आले. वंजारी हे नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत होते. या घोटाळ््याच्या चौकशीसाठी २०२४ मध्ये वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नियुक्त केली होती. समितीने १२ फेब्रुवारी २०२४ रोजी आपला अहवाल सादर केला. त्यात ५८० बनावट शालार्थ आयडी तयार करून अपात्र शिक्षकांना पगार मंजूर करण्यात आल्याचे नमूद केले होते.
लिपिकाने सांगितली नावे
पोलिस पथकाने तीन दिवसअगोदर अटक केलेल्या लक्ष्मण उपासराव मंघाम (४७) याला अटक केली होती. तो अगोदर शिक्षण उपसंचालक कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत होता. २०१९ पासून तो बनावट शालार्थ आयडी तयार करत होता. यासाठी त्याने कार्यालयाबाहेरही संगणकाचा वापर करून आयडी तयार करीत होता. त्याने चौकशीदरम्यान अनेक बड्या अधिका-यांची नावे घेतली. त्यामुळे चिंतामण वंजारी, छ. संभाजीनगर येथून वैशाली जामदार यांना अटक केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR