30.9 C
Latur
Wednesday, February 19, 2025
Homeलातूरशास्त्रोक्त पध्दतीने खुनाचा उलगडा

शास्त्रोक्त पध्दतीने खुनाचा उलगडा

लातूर : प्रतिनिधी
बाभळगाव नाका ते बसवेश्वर चौकाकडे जाणारे रिंग रोडचे लगत एका हॉटेलचे शटर लगत दि. ६ ते ७ फेब्रुवारी रोजीचे रात्री कोणीतरी अनोळखी इसमांने,अज्ञात कारणासाठी अनोळखी इसमांचे चेह-यावर दगड मारुन जिवे ठार मारलेची घटना घडली होती. याचा विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी शास्त्रोक्त पद्धतीने तपास करत खूनाचा उलघडा करत खुनातील आरोपीला अटक केली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंद चे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर येथील  पथकाला सखोल मार्गदर्शन व सुचना करून रवाना करण्यात आले होते. दरम्यान सदर पोलीस पथकाने मोठ्या प्रमाणात गोपनिय बातमीदार नेमूण त्यांचेकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून अनोळखी मयताची ओळख पटवली.  सदरचा मयत हा बीड जिल्ह्यातील नेकणूर तालुक्यात राहणारा नजीर पाशा सय्यद असा असल्याचे निष्पन्न झाले.
  यावरुन पोलीस पथकांने तपासाची दिशा निश्चीत करून आटोकाट प्रयत्न करत नमुद मयत नजीर पाशा सय्यद याच्या मारेक-याचा शोध घेत होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदर पथकांने  दि. १४ फेब्रवारी रोजी सतिष भिमराव वाघमारे, वय-३६ वर्ष रा. चाटगाव ता.धारूर जि.बीड ह.मु.विठ्ठल नगर, खणी विभाग,लातूर यास त्याचे राहते घरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता सतिष वाघमारे हा मयत नजीर सय्यद याचा मित्र असून काही दिवसापुर्वी त्यांच्यात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी सतीष वाघमारे यांने झोपलेल्या नजीर सय्यद याचे डोक्यावर मोठ्या दगडाने मारून गंभीर जखमी करून खून केल्याचे कबूल केले आहे. काहीएक उपयुक्त माहिती नसतानाही शास्त्रोक्त पद्धतीने तपास करत पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर येथील पो. नि. संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करत अनोळखी मयताची ओळख पटवली व गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधीकारी (लातूर शहर) रणजीत सांवत यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंद चे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे विवेकानंदचे सपोनि पंकज शिनगारे, वसंत मुळे, पोउपनि अनिल कांबळे, दगडु बुक्तारे, पथका मधील पोलीस अंमलदार खुर्रम काझी, गणेश यादव, यशपाल कांबळे, रवी गोंदकर, राणा देशमुख, संजय बेरळीकर, रमेश नामदास, रामचंद्र गुंडरे, आनंद हल्लाळे, अझहर शेख, इसा शेख, पोलिस उपनिरीक्षक केंद्रे, पोलिस निरीक्षक अशोक अनंत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीतकुमार पुणेकर, पोलीस अंमलदार धनंजय गुट्टे, शैलेश सुडे, गणेश साठे, अंजली गायकवाड यांनी केलेली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR