23.5 C
Latur
Sunday, June 1, 2025
Homeमहाराष्ट्रशिंदे गटाची तुमाने, गवळींना उमेदवारी

शिंदे गटाची तुमाने, गवळींना उमेदवारी

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील विधानपरिषदेच्या ११ जागांकरिता होणा-या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तिकीट न दिलेल्या माजी खासदारांना संधी देण्यात आली. विधानपरिषदेसाठी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

भाजपने त्यांच्या ५ नावांची घोषणा केली. त्यानंतर शिंदे गटाकडूनही दोन नावांची घोषणा केली. भावना गवळी या पाच वेळेच्या खासदार असून त्यांना यावेळच्या लोकसभेसाठी तिकीट नाकारले होते तर कृपाल तुमाने रामटेकमधून दोन वेळा निवडून आलेले होते. त्यांनाही तिकीट नाकारून त्या ठिकाणी कॉंग्रेसच्याच राजू पारवे यांना संधी देण्यात आली होती. भावना गवळी यांना संधी दिल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत यवतमाळ आणि वाशिमसह आजूबाजूच्या परिसरात शिंदे गटाला फायदा होऊ शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR