21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदे गटात वादाच्या ठिणग्या; मध्यरात्रीच दोन नेत्यांमध्ये राडा

शिंदे गटात वादाच्या ठिणग्या; मध्यरात्रीच दोन नेत्यांमध्ये राडा

अमरावती : प्रतिनिधी
अमरावतीमधील शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. दोन जिल्हाप्रमुखांमध्ये रात्री वाद झाल्याचे समोर आले आहे. जिल्हाप्रमुख गोपाल अरबट आणि अरुण पडोळे यांच्यात वाद झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना काल (२० जुलै)रात्री घडल्याची माहिती मिळाली आहे.

जिल्हाप्रमुख अरुण पडोळे आणि त्यांच्या मुलांसह काही जणांनी हल्ला केल्याचा आरोप जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी केला आहे. गोपाल अरबट यांनी हा आरोप अरुण पडोळे यांच्यावर केला आहे. याप्रकरणी गोपाल अरबट यांनी दर्यापूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दर्यापूर ते अमरावती मार्गावरील प्रसाद मंगल कार्यालयाजवळ हल्ला झाल्याचा आरोप अरबट यांनी केला आहे.

पक्षातील मतभेदामुळे हल्ला झाल्याची चर्चा अमरावती जिल्ह्यात रंगली आहे. शिंदे गटाचे अमरावती शहर जिल्हाप्रमुख अरुण पडोळे आणि गोपाल अरबट यांच्यात हा राडा झाला आहे. तर गोपाल अरबट यांनी मारहाणीचे आरोप करत थेट पोलिस ठाणे गाठले. गोपाल अरबट यांच्या तक्रारीवरून अरुण पडोळे यांच्यासह त्यांच्या मुलावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी आरोप केला आहे की, शिंदे गटाचे अमरावती शहर जिल्हाप्रमुख अरुण पडोळे आणि त्यांचा मुलगा राम पडोळेसह २० ते २५ कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. ही धक्कादायक घटना दर्यापूर ते अमरावती मार्गावरील प्रसाद मंगल कार्यालयाजवळ घडली. शिंदे गटात वादाच्या ठिणग्या पडत असल्याचे दिसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR