पुणे : अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना शिक्षकांचा पगार झाला नसल्याचे पत्रकारांनी सांगितले. त्यामुळे अजित पवार म्हणाले, काम करणा-या प्रत्येक घटकाचे पगार वेळेवर झाले पाहिजेत. जर पगार झाले नसतील तर ताबडतोब कसे होतील, त्यासंदर्भात पावले उचलणार आहे.
दरम्यान, राज्यातील शिक्षकांचा पगार रखडला असल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यामुळे त्यासंदर्भात गुरुवारी पुण्यात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. महिन्याला मिळणारा पगार हा नाजूक विषय असल्यामुळे त्याची गंभीर दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट घेतली. त्यांनी माध्यमांसमोरच थेट अर्थ विभागातील अधिका-यांना फोन लावला. पगाराचा निधी दिला गेला का नाही? यासंदर्भात खातरजमा केली. त्यावेळी अर्थ विभागातील अधिका-यांनी पगाराचा निधी दिला गेल्याचे सांगितले. अजित पवार यांच्या या कार्यशैलीचे चांगलेच कौतुक होऊ लागले आहे.
अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना शिक्षकांचा पगार झाला नसल्याचे पत्रकारांनी सांगितले. त्यामुळे अजित पवार म्हणाले, काम करणा-या प्रत्येक घटकाचे पगार वेळेवर झाले पाहिजेत. जर पगार झाले नसतील तर ताबडतोब कसे होतील, त्यासंदर्भात पावले उचलणार आहे. त्याचवेळी त्यांनी थेट अर्थविभागातील अधिका-यांना फोन लावला. त्यांना शिक्षकांचा पगाराचा निधी दिला गेला की नाही? यासंदर्भात विचारणा केली. अधिका-यांनी निधी दिला गेला असल्याचे उत्तर दिले