21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
HomeFeaturedशिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक लांबली

शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक लांबली

 

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच जाहीर करण्यात आलेली शिक्षक, पदवीधरच्या चार मतदारसंघांसाठी जाहीर केलेली निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. या चार जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार होते, तर १३ जूनला मतमोजणी केली जाणार होती.

शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. आयोगाने या संदर्भात विचारविमर्श करून महाराष्ट्र विधान परिषदेच्या उक्त द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नंतरच्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानपरिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उद्धवसेनेचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील व नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२४ रोजी संपत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR