31.6 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeलातूरशिरीष मोरे यांचा आदर्श अधिकारी म्हणून गौरव  

शिरीष मोरे यांचा आदर्श अधिकारी म्हणून गौरव  

लातूर : प्रतिनिधी
ग्राम गौरव मिडिया फाउंडेशन तसेच अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने, जिल्हा परिषद पुणे यांच्या विशेष सहकार्याने तसेच इन्फन इट स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या सौजन्याने दि. ३ एप्रिल रोजी पुणे येथे लातूरचे शिरीष रामचंद्र मोरे यांना ग्राम मर्मी कर्मयोगी आदर्श अधिकारी पुरस्काराने गौरविण्यात आले.
लातूर येथील रहिवासी असणारे व पुणे जिल्हा परिषद येथे सेवेत असणारे शिरीष मोरे यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गत २५ वर्षांत विविध मुलभूत सोई सुविधा, विविध विकास कामे ग्राम पंचायत विकास आराखडे तयार करुन त्यामार्फत सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात  भरीव योगदान दिले असुन अनेक समाजोपयोगी कामे करून आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. म्हणुन त्यांना व त्यांच्या पत्नी निशिगंधा मोरे  यांचा गौरव करण्यात आला. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु एस. एस. मगर, माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी व सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पुणे जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रदिप कंद यांच्या हस्ते मोरे दांप्त्याचा गौरव करण्यात आला.  त्यांच्या या यशाबद्दल सुरज बाहेती, डॉ. चंद्रशेखर गवळी, प्रा. दत्ता गवळी, प्रफुल्ल सूर्यवंशी, अमर गवळी, दत्ता ठवळे, विजय उपासे,  अफसर शेख, सिकंदर शेख, सुनील कांबळे, किरण बनसोडे, मधुकर होळीकर, प्रमोद मोरे यांनी अभिनंदन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR