22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरशिरुर अनंतपाळ तालुक्यात शासकीय योजनांचा जागर

शिरुर अनंतपाळ तालुक्यात शासकीय योजनांचा जागर

शिरुर अनंतपाळ : प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकापर्यंत पोहोचाव्यात तसेच त्यांना या योजनाचा लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही विशेष मोहीम दि २४ नोव्हेंबरपासून तालुक्यात सुरू करण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जात आहे सोबत लाभार्थ्यांना विविध लाभाचे वितरण नाव नोंदणी करण्यात येत आहे या यात्रेत ग्रामस्थांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.

ग्रामीण भागासाठी जल्हिा परिषद च्या माध्यमातून पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी बी टी चव्हाण व नोडल अधिकारी दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संपर्क अधिकारी व्यंकटेश मंडावले यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी या विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत गावोगावी शासकीय योजनांची माहिती देत विविध योजनांसाठी लाभार्थींची नाव नोंदणी करून घेत असून याचा समारोप दि. १५ डिसेंबर रोजी हिप्पळगाव येथे होणार आहे.

या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना जलजीवन मिशन आयुष्यमान भारत योजना प्रधानमंत्री उज्वला योजना स्वच्छ भारत मिशन कृषी विभागाच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथाही चित्रफितीद्वारे दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे त्यांना लाभाचे वितरण करणे वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. ‘ विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम २४ नोव्हेंबर ते २६ जानेवारी २०२३ या कालावधीत राबविली जात आहे. तेव्हा संबंधित गावातील नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या ‘विकसित भारत संकल्प यात्रेसाठी पंचायत समितीतील चंद्रकांत कदम, पं.स.कृषीचे रामचंद्र ननंदकर, अमोल गायकवाड, संतोष भोसले, सदानंद नरहरे, लक्ष्मण नाटकरे, नागनाथ जाधव, तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण खताळ, आत्माचे बालाजी तिवडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख, आयुष्यमान भारतचे शिवाजी टोंम्पे, विकसित भारत संकल्प यात्राचे पथक, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, आशाताई, अंगणवाडीसेविका, मदतनीस व ग्रामपंचायत कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR