24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरशिरूर अनंतपाळ तालुक्यातील ४१ अंगणवाड्या होणार डिजीटल

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ४१ अंगणवाड्या होणार डिजीटल

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी 
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ४१ अंगणवाडींसह देवणी तालुक्यातील अंगणवाड्या डिजिटल होणार असून राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या अंगणवाडी डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना कलाभिमुख आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदतच होणार आहे. बालविकास योजने अंतर्गत जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यातील अंगणवाडी डिजिटल बनवणे व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली होती त्या मागणीला मंत्री तटकरे यांनी मान्यता दिली आहे.
 दरम्यान बालवयातच बालकांना सुसंस्कारीत करण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सुविधा  उपलब्ध करून बालपणापासून शाळेत येण्याची गोडी निर्माण करून सुसंस्कारीत पिढी त्यातून निर्माण करणे गरजेचे असून बालकाचा बौद्धिक पाया ज्या वयापासून सुरु होतो, त्या वयात त्यांचा सर्वागीण बौद्धिक व शैक्षणिक विकास होण्यासाठी अशा अंगणवाडीची नितांत गरज असते. त्यासाठी शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यातील अंगणवाडी डिजिटल करण्यात यावी यासाठी, ऑक्टोबर २०२३ मध्ये तालुक्याचे भूमीपुत्र राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.
   अखेर राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मागणीला यश आले असून महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ४१ अंगणवाडी तसेच देवणी तालुक्यातील अंगणवाडी डिजिटल करण्यासाठीची मान्यता दिली असल्याची माहिती  राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दैनिक एकमतशी बोलताना दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR