27.4 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeलातूरशिरूर अनंतपाळ तालुक्यात १८६६ हेक्टरवर रबीचा पेरा

शिरूर अनंतपाळ तालुक्यात १८६६ हेक्टरवर रबीचा पेरा

शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
यावर्षी परतीचा पाऊस चांगला झाला, त्यामुळे रब्बीच्या आशा पल्लवित झाल्याने यंदा तालुक्यात १ हजार ८६६ हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक १ हजार ३६५ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाचा पेरा झाला असून त्या खालोखाल ३४७ हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीचा तर १५४ हेक्टर क्षेत्रावर करडईचा आतापर्यंत पेरा झाला असून यंदा ही सर्वाधिक हरभरा पिकांचा पेरा होणार आहे.
   तालुक्यात यंदा परतीचा पावसामुळे जमिनीतील ओलावा व मोठ्या प्रमाणात झालेल्या तणामुळे रब्बी पेरणीला संथ गतीने सुरुवात झाली आहे. हलक्या प्रतीच्या शेतजमीनीत सध्या पेरणीला वेग आला असला तरी नदी काठच्या शेतजमीनीत ओलावा असल्यामुळे तालुक्यात अद्याप फक्त दहा टक्केच पेरण्या झाल्या असून शेतकरी रब्बी पेरणी पूर्व मशागत करण्यात व्यस्त झाले आहेत.
दरम्यान शिरूर अनंतपाळ तालुक्यात यंदा १३ हजार १२४ हजार हेक्टर एवढे क्षेत्र रब्बी हंगामासाठी उपलब्ध असून यापैकी सुमारे ११ हजार १४० हेक्टर क्षेत्रांवर हरभ-याचा पेरा होणार आहे तर शिल्लक क्षेत्रावर रब्बी ज्वारी, करडई, गहू व इतर पिकांचा पेरा होणार आहे. सध्या १ हजार ८६६ हेक्टर क्षेत्रावर रब्बी ची  पेरणी झाली असून यासाठी कृषी विभागाकडून सर्व कृषी सहाय्यक प्रत्यक्ष बांधावर जाऊन पेरणीसाठी मार्गदर्शन करीत आहे. यंदा संततधार पावसाने खरीप हंगामातील पिकांना फटका बसल्याने उत्पादनात घट झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.  अशात परतीच्या पावसाने नदी नाले व प्रकल्पात पाणी आल्याने रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या असून  खरीपात झालेले नुकसान रब्बीत भरून निघेल अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR