30.6 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeलातूरशिरूर अनंतपाळ तालुक्यात गुढीपाडव्याचा सण उत्साहात

शिरूर अनंतपाळ तालुक्यात गुढीपाडव्याचा सण उत्साहात

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात आणि संपूर्ण महाराष्ट्रात हा सण उत्साहात साजरा केला जातो. यंदा ही तालुक्यात पारंपारिक शोभायात्रा आणि धार्मिक विधींनी गुढीपाडव्याचे स्वागत करण्यात आले. शिरूर अनंतपाळ शहरासह तालुक्यातील साकोळ, उजेड, येरोळ सह सर्व गावात गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला.

गुढीपाडवा खरेदीचा उत्साह गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. यंदा सोने, चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन आणि घर खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गुढीपाडवा या सणापासून हिंदू नववर्षाची सुरूवात होते. हिंदू पंचागानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो.

गुढीपाडव्याच्या दिवशी काही सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झालेल्या शहरातून हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शोभा यात्राही काढली जाते. इतंकच नाहीतर गुढीपाडवा हा सण विशेष अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढी उभारणं हा गुढीपाडवा या सणाचा महत्त्वाचा भाग असून गुढीला विजय, सौभाग्य, आणि समृद्धीच प्रतीक मानलं जातं

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR