शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यात मान्सून पुर्व अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी खासदार डॉ.शिवाजी काळगे यांनी प्रत्यक्ष शेतक-यांच्या बांधावर जाऊन केली. यावेळी उपस्थित महसूल व कृषी विभागाच्या अधिका-यांना तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक घेऊन मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तालुक्यात मागील दहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्याने तालुक्यातील शेतक-यांच्या कांदा, तिळ, टरबूज, कोथींबीर, आंबा इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रसंगी तहसीलदार गोविंद पेदेवाड, कृषी विभागाचे विवेकानंद साळुंके, उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग एस.जी. पवळे, अभियंता श्रीकांत कांबळे, पवन शेरसांडे यांची उपस्थिती होती. दरम्यान गेली अनेक वर्षांपासून प्रचंड खराब झालेल्या नागेवाडी, होनमाळ व येरोळ रस्त्याची पाहणी करून लवकरच संबंधित विभागाची बैठक घेऊन रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले तसेच घरणी नदीवरील उदगीर रोड येथील पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून या पुलाच्या लगत वळण रस्ता तयार करण्यात आलेला आहे. हा वळण रस्ता पावसामुळे वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली होती
या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली तसेच पुलाचे काम जलद गतीने करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिल्या या वेळी अॅड.संभाजीराव पाटील, डॉ अरविंद भातांब्रे, महादेव आवाळे, बस्वराज मठपती, रामकिशन गड्डीमे, अशोक कोरे, व्यंकट हांद्राळे, संग्राम हवा, गुरुनाथ अचवले, प्रमोद धुमाळे, विश्वनाथ हंद्राळे, सोमेश्वर तोंडारे, शंभू एरंडे, महेश व्यवहारे, सिध्देश्वर चाकुरे, पप्पू धुमाळे, आसिफ उजेडे, प्रतीक पारशेट्टे यांच्यासह शेतकरी, नागरिक उपस्थित होते.