19.3 C
Latur
Tuesday, January 28, 2025
Homeलातूरशिरूर अनंपाळ तालुक्यात बहरले सोयाबीन

शिरूर अनंपाळ तालुक्यात बहरले सोयाबीन

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
सध्या पिकांना आवश्यक तेवढा पाऊस पडत असल्याने खरीप पिकांसह तालुक्यातील प्रमुख पीक असलेले सोयाबीन चांगलेच बहरले असून सध्या शेतकरी फवारणीसह पिकांतील आंतरमशागत करण्यात व्यस्त झाले आहेत. यंदा मृगात पेरणी झाल्याने उत्पादनात वाढ होणार, अशी अपेक्षा शेतक-यातून व्यक्त केली जात आहे. पिकांबाबतीत पाऊस चांगलाच मेहरबान झाला असला तरी सोयाबीन वाढीसाठी शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
यंदा मान्सूनपूर्व पावसानंतर मृग नक्षत्रामध्ये पडलेल्या पावसामुळे शेतक-यानी मोठ्या उत्साहात चाढ्यावर मुठ धरून काळ्या आईची ओटी भरली. सतत पडत असलेल्या हलक्या पावसात सोयाबीन चांगलेच बहरले असल्याने आता या पिकांच्या काळजी पोटी शेतकरी सध्या आंतरमशागतीत व्यस्त असून तालुक्यात सध्या सगळीकडे फवारणीसह अन्य कामांमुळे शेतशिवार माणसाने फुलून गेले आहे.
दरम्यान जिल्ह्यातत सर्वाधिक सोयाबीन पिकवणारा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ३१ हजार ५०० हेक्टर एवढे असून यापैकी २८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र खरिप हंगामातील पेरण्यासाठी उपलब्ध होते. सध्या तालुक्यातील पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या असून सुमारे २६ हजार १४९ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सुमारे ९० टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वाधिक २२ हजार ३० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन,२ हजार ९९६ हेक्टरवर तुर,२६७ हेक्टरवर मुग, २००  हेक्टवर उडीद,१६ हेक्टरवर मका, २८ हेक्टरवर खरीप ज्वारी,८० हेक्टरवर कापूस तर फक्त तीन हेक्टरवर तीळ पिकाचा पेरा झाला असून उर्वरित क्षेत्रावर फळपीक ,ऊस ,कोंिथबीर, भाजीपाला ,चारा पिकांचा पेरा झाला आहे. यात सर्वाधिक सुमारे २२ हजार ३० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. सध्या सोयाबीन चांगले बहरले असून यंदा मृगात पेरणी झाल्याने उत्पादनात मोठी वाढ होईल असे शेतक-यांतून बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR