मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्यांच्यावर ६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. २०१५- २०२३ या काळात इन्व्हेस्टमेंट डीलच्या नावाखाली त्यांनी गैरव्यवहार केल्याचे म्हटले आहे. मात्र शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना परदेश दौ-याची परवानगी नाकारली आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी थायलंडमधील फुकेत येथे पिकनिकला जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र उच्च न्यायालयाने ती नाकारली.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी देखील सुरू आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी परदेशात प्रवास करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध जारी केलेल्या लूक आऊट सर्क्युलरला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळली.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी २ ते ५ ऑक्टोबर दरम्यान पिकनिक प्लान केली होती. ज्यासाठी त्यांनी हॉटेलचे अॅडव्हान्स बुकिंग केले आहे. याची माहिती देखील त्यांनी उच्च न्यायालयात दाखवली. मात्र त्यांना परदेशात फिरण्याची परवानगी नाकारली. हायकोर्टाच्या निर्णयामुळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा परदेशात सुटीवर जाऊ शकत नाहीत.