लातूर : टीम एकमत
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्ह्यात विविध ठिकाणी पक्ष, संघटना, संस्थांच्या वतीने साजरी करण्यात आली. शिवजन्मोत्सवाच्या वतीने विविध ठिकाणी मिरवणुका, रॅली, सांस्कृतीक कार्यक्रम, रक्तदान शिबीर तसेच व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार आर्पण करुन अभिवादन करण्यात आले. विविध ठिकाणी पुतळा, परिसरात सुशोभीकरण करण्यात आले होते. विशेषत: तरुणांमध्ये उदंड उत्साह दिसून आला.
रेणापूर शहर व तालुका काँग्रेस वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सेवादल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंत पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शम्मशोद्दीन शेख, संचालक बाजार समिती बाळकृष्ण खटाळ, काँग्रेसचे ज्येष्ठ पंडित माने, माजी नगरसेवक भूषण पनुरे, उमेश सोमाणी, अजय चक्रे, बाळासाहेब करमुडे, सचिन इगे, सतीश चव्हाण, तानाजी सुर्यवंशी, भिसे साहेब, प्रा.सिध्दार्थ चव्हाण ,देवानंद गायकवाड, गोपाळ पांचाळ यांच्यासह काँग्रेसचे पदधिकारी व कार्यकर्त, शिवप्रेमी नागरीक उपस्थित होते.
बालाजी पाटील यांच्या हस्ते शिवपूजन
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने गावामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दि १९ फेब्रुवारी रोजी बालाजी धोंडीराम पाटील यांच्या हस्ते शिव पूजन करण्यात आले . याप्रसंगी गावातील सर्व शिवजयंती महोत्सव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते