24.2 C
Latur
Friday, February 7, 2025
Homeधाराशिवशिवसेना ठाकरे गटाचे नेते बाबा पाटील अपघातातून बचावले

शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाबा पाटील अपघातातून बचावले

उमरगा : प्रतिनिधी
तालुक्यातील उमरगा-लातूर रोडवरील नारंगवाडी पाटीजवळील पुलावर लातूरकडून येणा-या पिकअपने बाबा पाटील यांच्या इनोव्हा कारला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते बाबा पाटील किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघातात अन्य ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात दि. ०७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास घडला.

लातूर-उमरगा रोडवरील नारंगवाडी पाटीजवळील पुलावर लातूरकडून येणारा पिकअप क्र. एमएच-०६ एजी ८९०४ याने उमरगाकडून लातूरकडे निघालेल्या इनोव्हा कार क्रमांक एमएच २५ एडब्ल्यू ००९९ ला जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली. अपघातात इनोव्हा कार व पिकअपचे मोठे नुकसान झाले असून, कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. या अपघातात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते बाबा पाटील हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना प्रथमोपचाराकरिता उमरगा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एअर बॅग उघडल्याने दुर्घटना टळली
उमरगा रोडवर झालेल्या अपघातात शिवसेना ठाकरे गटाचे बाबा पाटील जखमी झाले. कारच्या एअर बॅग उघडल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. लातूर-उमरगा रोडवरील नारंगवाडी तलावाजवळ हा अपघात झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR