24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीशिवसेना परभणी जिल्हाध्यक्षपदी नाना टाकळकर यांची निवड

शिवसेना परभणी जिल्हाध्यक्षपदी नाना टाकळकर यांची निवड

पाथरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात परभणी जिल्हा प्रमुख म्हणून मुंजाभाऊ नाना टाकळकर यांची मुंबई येथील शिवसेना कार्यालयात निवड झाल्यानंतर परभणी जिल्ह्यात आणि पाथरी विधानसभेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टाकळकर यांच्या निवडीमुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्यांना न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले नाना टाकळकर हे सर्वच क्षेत्रातील लोकांमध्ये मिसळणारे मनमिळाऊ आणि हसतमुख व्यक्तिमत्व आहे. अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या मार्गदर्शनात येणा-या काळात काम करायला आवडेल असे पाथरी येथील सत्कार समारंभात टाकळकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

पाथरी येथील फार्म हाऊसवर घेण्यात आलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमास माजी आ. माणिकराव आंबेगावकर, अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सईद खान, माजी जिल्हा परिषद सदस्य चक्रधर उगले, दादासाहेब टेंगसे, युसूफद्दीन अन्सारी, शाखेर सिद्दीकी, प्रल्हाद चिंचाने, सर्जेराव गिराम, विठ्ठल काका रासवे, अशोकराव गिराम, पप्पू घाडगे, याह्या दुर्राणी, हाजी कुरेशी, अमोल भाले, परभणीचे सलीम इनामदार, बंडू पाटील ढालेगावकर, माजलगावचे गुड्डू पटेल, दिलीप हिवाळे, फारूक दादा, भारतीय जनता पक्षाचे डॉ.राजेंद्र चौधरी, उद्धव नाईक, संतोष जोगदंड इत्यादीसह साजिद राज, इरफान शेख, सतीश वाकडे, अहमद आत्तार, शाहू गवारे आदी पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पत्रकार एल.आर कदम यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR