लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मोठे बळ मिळाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे माजी औसा तालुका प्रमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीश शिंदे यांनी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या विचारसरणीवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. याचबरोबर औसा तालुक्यातील बोरगाव नकुलेश्वर येथील सरपंच संतोष रसाळ, माजी सरपंच सुरेश वगरे आणि ग्रामपंचायतीचे सदस्यांसह अनेक स्थानिकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
पक्षप्रवेश करणा-यांमध्ये ग्रामपंचायत सदस्य मानसिंग साळुंके, राजाभाऊ घोडके, मारुती बनसोडे, बाळू कसबे, विनायक शिंदे, वैजनाथ पाटील, बालाजी साळुंके, शाहू भोकरे, लक्ष्मण वगरे, बबलू वगरे, ज्ञानेश्वर शिंदे, नितीन शिंदे, किसन कटारे, विठ्ठल जाधव, बाळू साळुंके, वाघा बनसोडे, अजय जाधव, लक्ष्मण घुले, परशुराम वगरे, तानाजी साळुंके, कमलाकर साळुंके, निळकंठ भंडारे, अशोक भंडारे, तात्या उबाळे, वैजनाथ पाटील, विश्वंभर पाटील, शिवराज कोळी, सोनेराव पाटील, मिटू साळुंके, जोतीराम जाधव, प्रवीण आंबेकर, विठ्ठल जाधव, विठ्ठल साळुंके, खंडेराव साळुंके, लक्ष्मण वगरे, प्रद्युम्न घुले, संजय जाधव, विकास लोखंडे, शेषराव पाटील, निळकंठ बाघल, दत्ता साळुंखे, आर. एन. बनसोडे, नामदेव पाटील, प्रसाद जाधव, पवन वगरे, यशराज साळुंके आणि इतरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी आमदार धिरज देशमुख यांनी सर्वांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रवेशामुळे लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली आहे, ज्यामुळे काँग्रेस उमेदवार धिरज विलासराव देशमुख यांना आगामी निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी काँग्रेसचे लातूर विधानसभा निरीक्षक रामहरी रुपनवर, जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन शाम भोसले, रवींद्र काळे, संतोष देशमुख, सचिन पाटील, अनुप शेळके, बाबासाहेब गायकवाड, सचिन दाताळ, राजकुमार पाटील, कल्याण पाटील, महेंद्र भादेकर, उमेश बेद्रे यांच्यासह अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.