27 C
Latur
Thursday, October 9, 2025
Homeलातूरशील पालन हा नीतिमत्तेचा पाया आहे : भिक्खू पय्यानंद थेरो

शील पालन हा नीतिमत्तेचा पाया आहे : भिक्खू पय्यानंद थेरो

लातूर : प्रतिनिधी
तथागत भगवान बुद्धाची शिकवण ही प्रज्ञा, करुणा, मैत्री आणि सद्गुण, शील सदाचाराची आहे. मानवी समाज हा नैतिकतेने प्रगत होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वार्थाने नैतिक गुणाचे पालन जबाबदारीने प्रत्येक स्त्री-पुरुषांनी करणे आवश्यक आहे. नैतिक गुणाचे पालन करणे म्हणजेच शील पालन करणे होय आणि म्हणूनच शील पालन हा नीतिमत्तेचा पाया असल्याचे प्रतिपादन भिक्खू पय्यानंद थेरो यांनी केले.
बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित महाविहार धम्म संस्कार केंद्र, सातकर्णीनगर, बार्शी रोड, रामेगाव ता. लातूर येथे अश्विन पौर्णिमेनिमित्त वर्षावास समापन व धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.  त्याप्रसंगी भिक्खू पय्यानंद थेरो बोलत होते.  प्रारंभी पवित्र बोधी वृक्षाची पूजा करून प्रतिकात्मक बौध्द चैत्य स्तुपाची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.तद्यनंतर महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण पंचशील व सामूहिक बुध्द  वंदना घेण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्य अभियंता प्रशांत दाणी, डॉ. बाबासाहेब शेंडगे, भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष आशाताई चिकटे, वंचित बहुजन आघाच्या शहराध्यक्ष सुजाता अजनिकर हे उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. सतीश डोंगरे, प्रा. यु. डी. गायकवाड, पूनम दाणी, ललिता गायकवाड, मंगल सुरवसे यांच्या सह प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी आशा चिकटे, कविता कदम, प्रतिभा आदमाने, सुजाता अजनिकर, कल्पना कांबळे, विलास अवशंक आदी जनाकडून भिक्खु संघास कठीण चिवरदान करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भंते बोधिराज, मिलिंद धावारे, ज्योतीराम लामतुरे, सतीश मस्के, अनिरुद्ध बनसोडे, उदय सोनवणे, करण ओव्हाळ, अविनाश आदमाने, कृष्णा सुरवसे, नवनाथ कांबळे, गौतम आदमाने सह धम्म सेवक ग्रुपच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR